पारिजातक... बोलीभाषेतला दुसरं नाव प्राजक्त. लहानपणापासूनच माझ्या आवडीचं फुल. लोकांना दिसण्यात गुलाब आवडतो, वासात जाई-जुई. मीच असा निराळा प्राणी आहे की पारिजातक आवडतो. मातोश्रींसमोर कितीतरी हट्ट केला प्राजक्ताच्या झाडासाठी. "एवढसं अंगण. त्यात या झाडामुळे साप येतात. किती मोठं झाड होतं ते. कसली पण फुलं कशी काय ग आवडतात तुला? ", असं करत करत नकारच मिळाला.
पंधरा वर्षे निघून गेली. आमचं घरही बदललं. गावी मोठंच्या मोठं अंगण आणि परस. "आता तरी लावूयात का गं झाड? ", अशी अक्षरशः एक वर्षे तिच्या मागे भूणभूण केल्यावर ती तयार झाली. तेही त्याची कथा आणि उपयोग सांगितल्यावरच. पारिजातकाची फुलं आहेतच तशी. कोणीही त्याच्या प्रेमात पडावं अशी. पांढरं शुभ्र फुल आणि नाजूकसा केशरी देठ. थोडा वेळ जरी हातात घेतली तरी हाताला सुगंध देऊन जातात..
पारिजातकाच्या बर्याच कथा-दंतकथा आहेत. समुद्रमंथन झालं त्यातून चौदा रत्ने बाहेर आली त्यातलं हे एक रत्न. इंद्रदेवांनी ते त्यांच्या दरबारात लावलं. एके दिवशी नारदांनी प्राजक्ताची फुले कृष्णाला दिली. कृष्णाला दोन भार्या. रुक्मिणी आणि सत्यभामा. कृष्णाने ती फक्त रुक्मिणीलाच दिली. नारद मुनींनी सगळा वृत्तांत सत्यभामेला जाऊन सांगितला.. नारदमुनींच कळ लावून द्यायचे काम झाले होते. झालं.. सत्यभामेने फक्त फुलंच नाहीतर झाडाचा पण हट्ट धरला.
सत्यभामेच्या हट्टापायी कृष्णाने इंद्रदेवांकडे पारिजातकाची मागणी केली. पण 'युद्ध जिंकल्यावरच झाड घेऊन जाता येईल' असं इंद्रदेवांनी कृष्णाला सांगितले. कृष्ण-इंद्र युद्धात कृष्णाचा विजय झाला पण इंद्रदेवांने कृष्णाला शाप दिला. 'ह्या झाडाची फुले फक्त रात्रीच उमलतील'. सत्यभामेच्या रुक्मिणी बद्दलच्या नेहमीच्या मत्सर करण्याच्या सवयीला अद्दल घडवायला म्हणून कृष्णाने सत्यभामेच्या अंगणात ते झाड असं लावलं की फुलं उमलल्यावर सगळी फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडतील. त्यावर कवी गदिमांच एक सुंदर कविता आहे. त्यातल्या पहिल्या दोन ओळी खालीलप्रमाणे आहेत.. 'बहरला पारिजात दारी. फुले का पडती शेजारी? '..
पारिजातकाची अजून एक कथा आहे. पारिजात नावाची एक स्वप्नाळू राजकन्या सूर्याच्या प्रेमात पडते. पण असंख्य प्रयत्नानंतर सुद्धा तिला सूर्य स्वीकारत नाही. या अपमानाने ती देहत्याग करते. असं म्हणतात की तिच्या अस्थींच्या राखेतून एका वृक्षाचा जन्म झाला आणि म्हणूनच या झाडाचं नाव 'पारिजातक' नाव पडले. ह्या झाडाची फुलं रात्रीच उमलतात आणि सूर्योदयापूर्वी जवळजवळ सर्वच फुले गळून पडलेली असतात. जसं काही रात्रभर ती राजकन्या फुलांच्या रूपात सूर्यासाठी आपले अश्रू ढाळत असते. म्हणूनच की काय या झाडाला 'ट्री ऑफ सॉरो' असही टोपण नाव आहे.
पारिजातकाचे आयुर्वेदात खुप फायदे सांगितले आहेत. पारिजातकाची पाने तापावर खूप गुणकारी आहेत. मलेरिया मध्ये पानांचा काढा दिल्यावर ताप लवकर उतरण्यास मदत होते. कफावर पण हा काढा गुणकारी आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी मध्ये या झाडाची साल वापरली जाते. दम्यासाठी खोडाच्या सालीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ घेतले तरी उपयुक्त ठरतं. बिया मुळव्याधा मध्ये लाभकारक असतात. फुले सुद्धा रंग तयार करण्यासाठी वापरली जातात. फुलांचा रस किंवा काढा, जंत केसगळती, रोगप्रतिकारशक्ती आणि महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्यांवर गुणकारी आहे. म्हणूनच या झाडाला आयुर्वेदात कल्पतरू असेही संबोधतात.
पहाटेचा मंद गार वारा, उगवतीला डोकावून पाहणारा सूर्य आणि त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा... वा-याच्या झुळुकीने सुद्धा खाली टपटप गळणाऱ्या प्राजक्ताचं फुल बघून बा. भ. बोरकरांची कविता आठवते.
'आज अचानक असे जाहले
सांजही भासे मला सकाळ
प्राजक्ताच्या आसवंत सखि
सवें मौक्तिकें आणि प्रवाळ..'