Wednesday, June 19, 2024

चार चौघी

 खूप बोअर होत होत.. सगळे टाईमपास करून झाल्यावर पण बोअर झालं की मी 2च कामे करते.  what's app che contact DP नाहीतर जुने फोटो डिलीट करणे. 

What's app contact बघता बघता तीच्या नंबर वर नजर थांबली. किती महीने, किती वर्षे आपण तिला मेसेज करतोय पण साधा deliver सुधा झाला नाही, कॉल करतोय पण कधी स्विच ऑफ तर कधी रिंग वाजते पण कोणी उचलत नाही. अचानक कुठे गायब झाली ती काय माहित.

तिचा नंबर बघुन विचार केला आज दुसऱ्या कोणाच्या नंबर वरून कॉल करून बघू... रिंग जात होती.. पलीकडून आवाज आला "हॅलो कोण बोलतय "..  जवळपास  3 वर्षांनंतर तिचा आवाज ऐकत होते.. मी म्हटल " श्रद्धा बोलतेय सीमा. कॉल कट नको करू. आणि माझ्या मैत्रिणीचा नंबर आहे. मी तुला माझ्या नंबर वरून कॉल करते, please उचल"..   ह्या 3 वर्षात आयुष्यात बरेच काही घडले होत... तिच्या, माझ्या, आम्हा सगळ्यांच्या.. दोघींनी जेव्हा एकमेकींच्या आवाज ऐकला तेव्हा पहिले 2 मिनिट तर दोघींनी पण डोळ्यांना वाहू दिलं... मनसोक्त..

"तु कॉन्टॅक्ट मध्ये का नव्हती त्यावर मला आताच काही बोलायचं नाही.. तुला जेव्हा वाटेल सांगावं तेव्हा तू सांग.. आताआता फक्त मला माझ्या हरवलेल्या मैत्रिणीशी बोलायचं आहे..  कशी आहेस आणि आपले कॉलेज चे ते दिवस.. इतकेच.. " - इति मी

पलीकडून हुंदक्या व्यतिरिक्त काही नाही..

"येतेस पुण्याला? भेटू.. आपली चौकट जमवू.. जिथून मैत्रीची सुरुवात झाली त्याच आपल्या चहा च्या जागी. नाहीतर जॉब लागल्यावर घरातल्या कोण कोणाला काय घ्यायचं ह्याची स्वप्न ज्या  JM road वर स्वप्न पहिली त्या JM रोड वर किंवा आपला नेहमीचा आवडता Deccan चा goodluck cafe आणि ते हि नाही तर जिथं दिवसाची संध्याकाळ झालेली नाही समजायची त्याच तुळसी बागेत पण चालेल.."  इती मी

"मी येईल, पण तू बाकी सगळ्यांच्या प्रश्नांना सांभाळशिल?" इति ती

"तु ये तर खरं. आमची rancho सापडली हेच खुप आहे.. नाहीतर त्या राजू रस्तोगी- फरहान कुरेशी सारखं झालं होत आमचं.. कुठे कुठे शोधू तुला 😂😂"- इति मी 

"एक सांगू तुला?  मला माहित होत, तु कुठून ना कुठून शोधून काढणार मला.. कदाचित मी ह्याच दिवसाची वाट बघत होते.  मोकळेपणाने बोलायला कोणीतरी पाहिजे होत..  मनावर ओझे वाटत होत कसले तरी.. उतरल्या सारखं वाटतेय... तु लोकेशन आणि वेळ ठरव, मी नक्की येईल"  - इति ती

लहानपणी एक मैत्री वरचा मूव्ही पाहिला होता.. Women centric, एकही पुरुष व्यक्तिरेखा नसलेला.. त्यातली काही वाक्ये खूप लागली होती मला.. 'मुलांची मैत्री वर्षानुवर्षे टिकते, मुलींची नाही टिकत. आई वर कविता असतात. मुलीवर पण सापडेल.. पण कधीच 2 मैत्रिणींवर झकास गाणे किंवा उत्तम कविता नाही सापडणार. बंधूभाव शिकवता आणि भगिनी भाव हा शब्द च dictionary मध्ये टाकायला विसरता'..

पण आता जग बदलतंय.. 

मुलीही मैत्री टिकवू शकतात.. कदाचित मुलांपेक्षा अजुन चांगली.. अगदी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून.. आणि खरच जुनी मैत्री लोणच्यासारखी असते.  जेवढी मुरेल तेवढी अजुन खुलते...

No comments:

Post a Comment

Popular posts from this author